नैतिकतेवर उद्धव ठाकरेंनी बोलूच नये; आधी भाजपसोबत नांदले नंतर शरद पवारांचा हात धरला – नारायण राणे

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी साताऱ्यात जावून खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्याच्या सत्तासंघर्षाच्या सुप्रीम कोर्टातील निकालावरुन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सुप्रीम कोर्टाकडून काल महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला. तर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवण्यात आली. तसेच तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढण्यात आले. यावर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रतिक्रियेवर नारायण राणे यांनी टीका केली.

उद्धव ठाकरेंची शिवसेना २०१९ पर्यंत भाजपसोबत नांदली. त्यानंतरत्यांनी स्वतः नैतिकता सोडली व काॅंग्रेस, राष्ट्रवादीशी युती केली. शरद पवारांचा हात पकडून ते सत्तेत बसले. आता त्यांनी नैतिकतेवर बोलू नये. ते घरात आहेत घरातच राहावे असा जोरदार प्रहार केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला.

राणे म्हणाले, नैतिकतेची बाब विचारात घेतल्यास २०१९ पर्यंत ठाकरे भाजपसोबत नांदले. त्यानंतर निवडणुका झाल्या. नंतर त्यांनी स्वतः नैतिकता सोडली व काॅंग्रेस, राष्ट्रवादीशी युती केली. शरद पवारांचा हात पकडून सत्तेत बसले. आता त्यांनी नैतिकतेवर बोलू नये. ते घरात आहेत घरातच राहावे.राणे म्हणाले,

शरद पवारांनी त्यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकात ठाकरेंबद्दल लिहुन ठेवले. त्यामुळे त्यांनी ठाकरेंचे काहीच ठेवलेच नाही. तरीही ठाकरे पवारांसोबत जाणार असे म्हणतात. त्यांच्यात आता काहीच ताकद राहीली नाही.