राज्यात त्र्यंबकेश्वरमधील वादावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत एसआयटी नेमण्याचे आदेश दिले आहेत. परंतु एसआयटीची नेमणूक करण्यापेक्षा डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमा, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यालाच प्रतित्यूर म्हणून भाजप नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मंदीर परिसरात मांसाहाराची दुकाने कशी चालतात. राज्य अस्थिर करणाच्या प्रयत्न राऊत करतात. महाराष्ट्रात दंगल कशी घडवायची, कुठे घडवायची? रझा अकादमीसाऱख्या लोकांना हाताला धरून, प्रयत्न ठाकरे गट करत आहे. मुस्लिम समाजाच्या राऊत प्रेमात आहे. संजय राऊत हे मुस्लीम लीगचे प्रवक्ते आहेत. असे नितेश राणे म्हणाले.
नीतेश राणे म्हणाले, भाजपवर दंगलींचे आरोप होत आहेत मात्र उद्धव ठाकरेंविषयी कोणीही बोलत नाहीये. खरे तर दंगली घडवणारा मास्टरमाईंड कलानगर येथे बसला आहे. उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. उद्धव ठाकरेंनी सत्ता आणण्यासाठी दंगली घडवल्या, अरुण बेदकेकर याविषयी ऑन रेकॉर्ड बोलायला तयार आहे. संजय राऊत निवडणुक आयोगाला चुना आयोग म्हणत आहेत. राज्य अस्थिर करण्याचा राऊतांचा प्रयत्न आहे. प्रशासनाला आदेश पाळू नका म्हणणे हे सगळे गुण अर्बन नक्षलतेचे आहेत. राऊतांच्या हालचाली तपासा, राज्य अस्थिर करण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे. ते दलालीसाठी हिंदुत्वाचा वापर करत आहेत. असंही नितेश राणे म्हणले.
