नारायण राणे यांना लावलेला न्याय लावून संजय राऊत यांना अटक होणार का?

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाविकास आघाडी सरकारने अटक केली होती. हाच न्याय लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्हभाषा वापरणाऱ्या खासदार संजय राऊत यांना अटक होणार का असा प्रश्न आता विचारला जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी एक विधान केलं. “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,’ असे ते म्हणाले होते. त्यानंतर सत्ताधारी असलेल्या तत्कालीन शिवसेनेने ठिकठिकाणी राणे यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. 153, 189, 504, 505(2) आणि 506 या कलमांतंर्गत नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेवत्या ताटावरून राणे यांना अटक करण्यात आली.

संजय राऊत यांनी तर त्यापेक्षाही गंभीर विधान केले आहे.मोदी स्वत: म्हणाले होते, काही चुकीचे घडल्यास मला जाहीर चौकात फाशी द्या. आता लोकांनीच चौकाचौकात जाहीर फाशीचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. पंतप्रधान मोदींनी स्वत: वधस्तभांकडे गेले पाहिजे. मला फासावर द्या म्हणाले होते तर फासाचा दोर पाठवू का आम्ही तुम्हाला? असेही त्यांनी विचारले आहे.