ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: वधस्तभांकडे जात देशाचे नोटबंदीमुळे मी किती नुकसान केले, याची माहिती घेतली पाहिजे. फाशीचा दोर पाठवू का, असे विचारले आहे. यावरून राऊत पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
घटनात्मक पदावरील व्यक्ती बाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्यावरून राऊत यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने बीडमध्ये आलेल्या संजय राऊत यांनी या कथित नोटबंदी वरून पंतप्रधान मोदींवर गरळ ओकली. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर मला फक्त 50 दिवसांचा वेळ द्या. सर्व ठीक होईल. त्यानंतरही जनतेला त्रास झाल्यास, माझी काही चूक निघल्यास मला भरचौकात फाशी द्या, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते, याचा संदर्भ देत नोटाबंदीचा कोणताही फायदा झालेला नाही. मोदी स्वत: म्हणाले होते, काही चुकीचे घडल्यास मला जाहीर चौकात फाशी द्या. आता लोकांनीच चौकाचौकात जाहीर फाशीचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. पंतप्रधान मोदींनी स्वत: वधस्तभांकडे गेले पाहिजे.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना यापुढे जाऊन राऊत म्हणाले, साडेतीन ते चार हजार लोक बँकांच्या रांगात मरण पावले. हा सदोष मनुष्यवध आहे. प्रायाश्चित्त घेणार आहात का? भाजप प्रायाश्चित्त घेणार आहे का? मला फासावर द्या म्हणाले होते तर फासाचा दोर पाठवू का आम्ही तुम्हाला?
