नव्या संसद भवनाला काँग्रेससह १९ पक्षांनी विरोध केला संसद भवनाच्या उदघाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण नुकतंच पार पडलं पूर्वीपेक्षा मोठी आणि आकर्षक अशी नवी संसद भारताला मिळाली आहे.संसदेच्या उद्घाटनानंतर नव्या संसदेत खासदारांसमोर उभे राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, प्रत्येक देशाच्या विकासात काही क्षण असे येतात, जे अनादी काळासाठी अमर होतात. आज तो क्षण आहे आपला देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाली आहेत. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. याच काळात आपल्याला आपली नवी संसद मिळाली आहे.
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारतीयांनी आपल्या लोकशाहीला संसदेची नवी इमारत भेट म्हणून दिली आहे. आज सकाळी संसद भवन परिसरात सर्व पंथांच्या प्रार्थना झाल्या आहे. नव्या संसदेच्या लोकार्पणानंतर मी सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो. नवी संसद हे १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचं प्रतिबिंब आहे. नवी संसद हे विश्वाला भारताच्या दृढसंकल्पाचा संदेश देणारं मंदिर आहे. नवीन संसद भवन आपल्या संकल्पांना सिद्धीशी जोडणारी कडी सिद्ध होईल.
काय अजित पवार म्हणाले
अजित पवार पुढे म्हणाले, आता या नव्या संसद भवनात सर्वांनी संविधानानुसार काम करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे. अजित पवार म्हणाले, याकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. जुनी संसद ब्रिटिशांनी बांधली होती हे आपल्या सर्वांना माहीत आहे. अनेक राज्यांनी स्वतःच्या विधानसभा इमारती बांधल्या आहेत. महाराष्ट्रात विधानसभेची नवीन इमारत असावी, अशी चर्चा सध्या आहे. संसदेची जुनी इमारत बांधली तेव्हा 35 कोटी लोकसंख्या होती. आता आम्ही 135 कोटींचा आकडा पार केला आहे. म्हणजे लोकप्रतिनिधीही वाढले आहेत. मला व्यक्तिशः असे वाटते की या नवीन इमारतीची गरज होती. कोरोनाच्या काळात विक्रमी वेळेत बांधकाम पूर्ण केले आणि शेवटी आम्हाला एक छान संसद भवन मिळाले.
