मी निधी मागतो देवेंद्र फडणवीस तिजोरी खोलून पैसे देतात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातील डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची प्रथम चाचणीचा आज (31 मे) यशस्वीपणे पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निब्रळ येथे जलपूजन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा सदाशिव लोखंडे, खा डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर,माजी मंत्री मधुकर पिचड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले निळवंडेसाठी ५३ वर्षे वाटं पाहावी लागली. प्रकल्पाबाबत अनेक चढ-उतार आले. झालं गेलं गंगेला वाहिलं आता स्वच्छ पाणी येणार.मी शेतकऱ्यांचा मुलगा हे काही लोकांना सहन होत नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा दिवस रात्र काम करतो. अनेक सूचनांचा आदर करणार हे सरकार आहे. आमचं मंत्रमंडळदेखील दिवस रात्र काम करतात. कारण शेतकरी हा अन्नदाता आहे. कुणालाही मोबदल्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही. काल कॅबिनेट मंत्रीमंडळात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आलं आहे.

हे सरकार अनेक प्रकल्प मार्गी लावत आहे. प्रत्येक गोष्टीला सरकार प्राधान्य देत आहे. यापुढे कोणत्याही कामाला निधी कमी पडणार नाही. कारण मी फक्त सांगतो आणि ते तिजोरी खोलतात. काही लोकांना वावडं आहे की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे हे काही लोकांना सहन होत नाही. का शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॉप्टने फिरू नये? शेतकऱ्याच्या मुलाने चांगल्या गाडीतून फिरू नये? बंदी आहे का?”, असे प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केले.

देवेंद्रजी तुम्हाला सांगू इच्छितो की, भिवंडीत एका शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॉप्टर विकत घेतलं आहे. म्हणून मी गावी जातो तेव्हा शेतीमध्ये रमतो. माती आणि आपल्यातील नातं कोणालाही नाकारता येणार नाही. शेवटी आपण मातीतील लोकं. म्हणून आम्ही दोघेही दिवसरात्र काम करत आहेत. मंत्रिमंडळ, अधिकारी दिवसरात्र काम करत आहोत”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.