अरिहा शाहाच्या प्रकरणात भारत सरकारने जर्मन सरकारला सुनावले खडेबोल

गुजरातची रहिवासी असलेली बेबी अरिहा शाहा 20 महिन्यांपासून जर्मनीत अडकली आहे. तेथे त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. मुलीच्या पालकांवर आरोप करून मुलीची रवानगी कोठडीत करण्यात आली. मात्र, नंतर फौजदारी आरोप वगळण्यात आले. मात्र मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले नाही. आता या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी मुलीला लवकरच भारतात आणण्याचे आश्वासन दिले आहे.

गेल्या वीस महिन्यांपासून जर्मनीतील फास्टर होममध्ये अडकलेल्या अरिहा शहा या चिमुकलीच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आज भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन अरिहा शहाच्या संदर्भात स्पष्टपणे भूमिका मांडली आहे.
एकनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या पत्रात या चिमुकलीला भारतात परत आणण्यासाठी शिंदे यांनी विनंती केली होती.काल झालेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी अरिहा शाहा संदर्भात जर्मन सरकारशी बातचीत करत असल्याची माहिती माध्यमांना दिली. तसंच आम्ही जर्मन सरकारला अरिहा शाहाला भारत सरकारला परत देण्याची मागणी केली. जर्मनीला भारत सरकारने तिला परत देण्याची मागणी केली आहे.
अरिहा शाहा ही मुंबई ची चिमुरडी आहे. तिच्या पालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर शिंदे यांना परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिलं होतं.या संदर्भात परराष्ट्र धोरणाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सध्या परदेश दौऱ्यावर असल्याचं सांगितलं.

काय आहे प्रकरण?
भावेश आणि धारा शाह यांची मुलगी अरिहा शाह 7 महिन्यांची असताना जर्मनीचे चाइल्ड केयर संस्थेचे लोक त्यांच्यासोबत घेऊन गेले होते. 20 महिन्यांपासून ही चिमुरडी त्यांच्याकडेच आहे. अरिहा शाहा हिला खेळत असताना तिच्या प्रायव्हेट पार्टला इजा झाली होती. तिच्यावर अत्याचार झाला असं जर्मनीच्या अधिकाऱ्याचं म्हणणं होतं. त्यामुळं तिला फास्टर होममध्ये घेऊन गेले. त्यानंतर जर्मनीच्या अधिकाऱ्यांनी अरिहाचं मेडिकल केल्यानंतर तिच्या अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र, अरिहाचे पालक तिला सांभाळण्यास असमर्थ असल्याचं सांगत फास्टर होम ने अरिहाला पालकांच्या ताब्यात देण्यास नकार दिला.