संजय राऊत दिसेल तेथे थुंकणार; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

मराठा समाजाला न्याय देत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाचा अपमान करत आहे. त्यामुळे संजय राऊत दिसेल तेथे त्यांच्यावर थुंकणार असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे.

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील म्हणाले, मराठा क्रांती ठोक मोर्चा कडून आम्ही संजय राऊत यांचा जाहीर निषेध करतो . हाच तो संजय राऊत आहे जो मराठा मोर्चाला मूक मोर्चा बोलला होता .आज विस्थापित कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री झाला आहे. त्या मुख्यमत्र्यांवार आणि त्याच्या लोकांवर थुंकण्याची भाषा हा करत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाला आत्ता न्याय देत आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री आणि त्याच्या मुलांसोबत आहोत. संजय राऊत यांच्यावर मराठा समाज थुंकल्याशिवाय आता राहणार नाही. कारण त्यांनी मराठा समाजाचा अपमान हा केला आहे.