ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आजार झाला आहे. पहिले ते भुंकायचे, आता थुंकतात. त्यामुळे सामनाच्या कार्यलयात रेबीज इंजेक्शनचा बॉक्स कुरिअरने पाठवणार असल्याचे शिवसेना नेते किरण पावसकर यांनी सांगितले.
पावसकर म्हणाले, काही झाले तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकत्र काम केले होते. त्यामुळे राऊत यांच्या आजारावर डॉक्टरांचे मत घेतले. त्यांच भुंकणे आणि थुंकणे सुरू आहे. म्हणून त्यांना रेबीज औषध पाठवत आहोत. यांनी त्यांच्यावर नक्कीच फरक पडेल.
