मुंबईतील लहान मुलांसाठी किलबिलाट ॲम्बुलन्स तयार करण्यात आलेली आहे. याचे उदघाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी फडणवीसांनी ठाकरे गटावर टोलेबाजी केली आहे. आमचे सरकार आपल्या दारी आहे. त्यांचे सरकार त्यांच्या घरी आहे, असा निशाणा फडणवीसांनी उध्दव ठाकरेंवर साधला आहे. राज्यात प्रथमच किलबिलाट रुग्णवाहिका सुरु होणार आहे. मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने ही रुग्णवाहिका सुरु होतेय. रस्त्यावर असलेली मुले सुटका करून त्यांचे पुनर्वसन करण्याचा हा अभिनव प्रयोग आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
प्रकाश आंबेडकर हे राजकारणाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची साक्ष तपासण्याची परवानगी द्या, अशी मागणी करणारे पत्र प्रकाश आंबेडकर यांनी लिहीले होते. त्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष तपासण्याची परवानगी द्या, अशी मागणी करणारे पत्र प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव चौकशी आयोगाला पाठवलं होतं. त्यावेळी माजी मुख्य सचिव सुमित मलिक आणि पुण्याचे माजी पोलिस अधिक्षक यांचीसुद्धा विटनेस बॉक्समध्ये साक्ष तपासायची असल्याचं आंबेडकरांनी नमूद केलं होतं. प्रकाश आंबेडकरांना ५ जून रोजी साक्ष नोंदवण्यासाठी आयोगाने बोलावलं होतं. त्या पत्राला उत्तर देताना पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपण ५ जूनला येऊ शकत नसल्याचं त्यांनी आयोगाला कळवलं होतं.
देवेंद्र फडणवीसांनी गुतवणूक कराराबद्दल माहिती देताना सांगितले की, आज महाराष्ट्रात पंप स्टोरेज प्रोजेक्ट च्या संदर्भात १३ हजार ५०० मेगावॅटचे करार केंद्र सरकारची एनएचपीसी आणि खाजगी क्षेत्रातील टॉरेंट पावर या दोन कंपन्यांशी केले आहेत. तसेच यातून जवळपास ७१ हजार कोटींची गुंतवणुक होणार आहे. तर ३० हजारांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
