मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सावंतवाडी दौऱ्यावर होते. शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सावंतवाडीतून बोलत होते. यावेळी त्यांनी कोकणाच्या विकासासाठी महत्वाच्या घोषणा केल्या. एमएमआरडीएच्या धर्तीवर कोकण विकास प्राधिकरण स्थापन करणार असे ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर आदी नेते मंडळी उपस्थित होती. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी कोकणासाठी घोषणांचा पाऊस पाडला आहे.डबल इंजिनचे सरकार केंद्रसरकारच्या मदतीने राज्यातील विकासकामांना गती देत आहेत. मुळात मागच्या सरकारमध्ये अनेक प्रकल्प थांबवले गेले होते. मात्र, आमचे सरकार येताच त्या सर्व प्रकल्पांना लावलेले ब्रेक हटवले, असे प्रतिपादन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआ सरकारला टोला मारला.
कोकणाच्या पर्याटनासाठी सर्वोतपरी मदत करणार असून आंबोली येथे हिल स्टेशन उभारणार, असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सावंतवाडीसाठी 110 कोटींचा निधी देणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. पर्यटनवाढीसाठी लागणार निधी राज्य सरकार देणार. मुंबई-गोवा महामार्गाला चालना देण्याचा प्रयत्न करणार, असे त्यांनी सांगितले.समृद्धीप्रमाणचं मुंबई सिंधूदुर्ग महामार्ग करणार. कोकण विकास नियोजन प्राधिकरण आम्ही करतोय, त्यामुळे कोकणाच्या विकासाला गती मिळेल. अनेक संस्था या प्राधिकरणाच्या माध्यमातून एकत्र येणार असून यामुळे कोकणाच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.
यांसह पर्यटनवाढीसाठी लागणारा निधी राज्य सरकार देणार.अडीच वर्षांपूर्वी जे स्पीड ब्रेकर निर्माण केले गेले ते सर्व दूर केले गेले. मागच्या सरकारच्या काळात अनेक प्रकल्प थांबवले गेले. आम्ही जो प्रस्ताव केंद्राला पाठवतो त्यासाठी संपूर्ण पैसा केंद्र सरकार देते. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे आभार मानतो. याआधी इतका निधी कोणी दिला नाही. सिंधुदुर्गाला निधी कमी पडू देणार नाही. नारायण राणे यांच्या खात्यातील योजनाही आपण घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे हात तयार करा. मी तुम्हाला खात्रीपुर्वक सांगतो की, राणे यांच्या विभागाच्या माध्यमातून आपण हजारो लाखो नोकरी देणारे हात निर्माण करु शकतो.असं मोठं आश्वासनदेखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं.
