पक्षाने संधी दिल्यास पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढण्यास तयार-मनसे नेते वसंत मोरे

मनसे नेते वसंत मोरे याना त्या कारणाने नेहमी चर्चेत असतात. कधी पक्षातील नाराजीमुळे नाराज असतात तर कधी एखाद्याला मदत करण्यामुळे चर्चेत असतात. चहाच्या टपरीवर चहा करण्यापासून असो की भटकंतीपर्यंत या ना त्या कारणाने वसंत मोरे नेहमीच चर्चेत असतात. मागे त्यांना धमकी आली होती. त्यामुळेही ते चर्चेत आले होते. यावेळीही ते एका कारणामुळे चर्चेत आले आहेत भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. पुण्याच्या या जागेसाठी भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहेत. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरु झाली असताना मनसे देखील मैदानात उतरणार असल्याचे दिसत आहे. पुण्यातील मनसे नेते वसंत मोरेयांनी पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मनसेकडून आपला हुकमी एक्का फायरब्रँन्ड नेते म्हणून ओळख असलेले वसंत मोरे यांना उमेदवारी देण्याची मागणी मनसे सैनिक करत आहे. तर पक्षानं जर संधी दिली तर मी निवडणुकीसाठी तयार आहे, असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी बोलताना वसंत मोरे यांनी हे मोठं विधान केलं आहे.पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवण्याची तुमची इच्छा आहे का? असा प्रश्न वसंत मोरे यांना विचारण्यात आला.यावर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, निवडणूक लढवण्यासाठी इच्छा का नसावी? माझं काम चांगलं आहे.राजकारणात असेल तर मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत

वसंत मोरे म्हणाले, पक्षाने जर संधी दिली तर मी निवडणुकीसाठी तयार आहे. 2017 ची पुणे महानगरपालिकेची निवडणूक पाहिली तर मध्यमवर्गीय उमेदवार होते, तरीपण पुणे शहरातील मतदान पाहता 3 लाख 79 हजार मतं आहेत. पोटनिवडणुकीत कोण मोठा तुल्यबळ नेता धाडस करणार आहे. मनसे कार्यकर्ता जर कामाला लागला तर चमत्कार घडू शकतो असेही वसंत मोरे म्हणाले.