दूरदर्शनच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचं निधन

दूरदर्शनवरील पहिल्या इंग्रजी वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचं बुधवारी अल्पशा आजारानं निधन झालं. भारतीय टीव्ही पत्रकारितेतील एक आयकॉन, दूरदर्शनच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचं बुधवारी निधन झालं. त्या ७६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. अय्यर यांच्या निधनाबद्दल वृत्तपत्रसृष्टीत तीव्र दु:ख व्यक्त होत आहे.

गीतांजली अय्यर ७२ वर्षांच्या होत्या. आजवरच्या नामवंत वृत्त निवेदकांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश आवर्जून केला जातो. जवळपास ३० वर्षांहून अधिक काळ त्यांनी दूरदर्शनवर अँकरिंग केले. दूरदर्शन मध्ये वृत्तनिवेदक म्हणून १९७१ मध्ये त्यांनी जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी सलग तीन दशके आपल्या अमोघवाणीने वृत्तनिवेदन केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार मिळाला आहे.

गीतांजली अय्यर यांच्या निधनाची बातमी कळताच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनुराग ठाकूर म्हणाले, दूरदर्शन आणि इंडिया रेडियोच्य पहिल्या लोकप्रिय इंग्रजी वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांच्या निधनाची कळताच धक्काच बसला. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि कुटुंबियाला हे अपरिमित दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

गीतांजली अय्यर यांनी दूरदर्शनमध्ये 1971 साली वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. आजवरच्या नामवंत वृत्तनिवेदकांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश आवर्जून केला जातो. 1989 साली त्यांना इंदिरा गाधी प्रियदर्शनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गीतांजली अय्यर यांनी कोलकाताच्या लोरेटो महविदयालयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये डिप्लोमा केला.