महाराष्ट्रात आमच्यासारख्या मावळ्यांना औरंगजेब चालणार नाही-खासदार नवनीत राणा

औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराची चर्चा महाराष्ट्रात गेल्या 20 वर्षांपासून सुरू होता.काही महिन्यांपूर्वी AIMIM पक्षाचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन औवेसी काही दिवसापूर्वी औरंगाबादला येऊन गेले होते. औरंगाबादमध्ये त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. त्यामुळे एका नवीन राजकीय वादालाही तोंड फुटलं होतं.औरंगाबादपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या खुलताबाद शहरात औरंगजेबाची कबर आहे. पण, दिल्लीचा बादशाह असलेल्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात आणि औरंगाबादमध्ये कशी आली, असा प्रश्न पडणं साहजिक आहे.

औरंगजेबाच्या नावाची मोठी चर्चा राज्यभर होताना दिसत आहे कोल्हापुरात काही समाज कंठकांनी औरंगजेब आणि टिपू सुलतान फोटो सोशल मीडियावर झळकल्याने कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत बुधवारी मोठं अंदोलन झाले होते त्यावर खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचणाऱ्यांना थेट आव्हान दिले गेल्या २ दिवसांपासून औरंगजेबाच्या प्रतिमेवरुन राज्याच्या काही भागात तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी कडक शब्दात प्रतिक्रीया दिली आहे. या महाराष्ट्रात आमच्यासारख्या मावळ्यांना औरंगजेब चालणार नाही. तसेच या मागचे मास्टरमाईंड कोण आहेत यावर सराकारने कठोर कारवाई करावी, असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत.