पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या जागेवरून आता महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे दिसतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुणे लोकसभा निवडणुकीवर दावा केला होता. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेसच लढणार असल्याचे स्पष्ट सांगिलेय. कुणी काहीही दावा केला तरी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेसच लढणार, असे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी आज सांगितले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत आतापर्यंत पुणे मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहे. या मतदारसंघात त्यांचे उमेदवार अनेकदा निवडूनही आले आहे. लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीच्या जागावाटपाचा निमित्ताने झालेल्या बैठकीत जागा वाटपाचे सूत्र ठरल्याचे जाहीर झाले आहे. तरीही पुण्याच्या जागेवर अजित पवार यांनी पुन्हा एकदा दावा केल्याने काँग्रेसमध्ये गोंधळ उडाला आहे.तसं काही नाही, आम्ही 48 लोकसभेबाबत चर्चा करतोय. त्यात काही कार्यकर्ते म्हणतात ही जागा काँग्रेसला घ्या, तो कार्यकर्ता मीडियाला येऊन सांगतो आणि तशा बातम्या चालतात. मात्र तूर्तास त्या चर्चांमध्ये तथ्य नाही. लवकरच एकत्र बसून जागा वाटप होईल, असे थोरात म्हणाले.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “राजकारण खालच्या पातळीला पोहोचलेलं आहे. आम्ही सध्या टीव्ही पाहणं सोडून दिलं. कोणीतरी काहीतरी बोलावं आणि ते जनतेने ऐकावं?. राजकारणी लोक आपली बोलण्याची आचार संहिता पाळणार नसतील तर चॅनेलवाल्यांनी तरी आचार संहिता करावी अशी माझी मागणी आहे. असे स्टेटमेंट असतील तर टीव्हीवाल्यांनी दाखवू नये. कोणी काय बोलावं याला काही लिमिट आहे की नाही? विधानसभेत सर्वात जास्त मी निवडून आलेलो आहे. माझ्या ४० वर्षाच्या राजकारणात असं पाहिलं नव्हतं. एकमेकांचा आदर करण्याची संस्कृती जपली पाहिजे.”
