काेल्हापूर पूर्वपदावर; इंटरनेट सेवा सुरळीत, १९ जूनपर्यंत जमावबंदी

राज्यात छ.संभाजीनगर नामांतर झाल्यानंतर एमआयएमने नामांतराविरोधात आंदोलन केले त्या आंदोलना वेळी काही समाज कंठकांनी अगोदर औरंगजेबाचे फोटो झळकवले त्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यामध्ये असे औरंगजेबाचे फोटो झळकले कोल्हापूर शहरातील झालेल्या राड्यानंतर संवेदनशील भागात पुढील 31 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कुठल्याही अफवा, चुकीच्या गोष्टी आणि तत्सम बातम्या व्हॉटस्अपवरुन किंवा सोशल मीडियावरुन व्हायरल होऊ नयेत यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी सात तरुणांकडून आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये बुधवार दुपारपासून राडा सुरू आहे.

कोल्हापूर शहरातील सात तरुणांनी त्यांच्या व्हॉटस्अपवर स्टेटसला टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे फोटो ठेवले आणि इथंच वादाची ठिणगी पडली. या स्टेटस विरोधात आज हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. कार्यकर्ते आधी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले, नंतर ते मोर्चा काढणार होते. पण मोर्चा काढण्यास पोलिसांनी मनाई केली. यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि घोषणा देऊ लागले. अखेर त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. अश्रुधुराचा वापरही करण्यात आला होता. दुपारी साडे बाराच्या सुमाराला स्थिती नियंत्रणात आली दरम्यान, शिवाजी चौक आणि महापालिका मुख्यालय परिसरातील तणाव निवळून आता शांतता निर्माण झालीय.कोल्हापुरातील काही तरुणांनी औरंगजेबाचं आणि टिपू सुलतानचं स्टेटस ठेवलं होतं, त्यानंतर हा राडा झाला. त्यानंतर शहरातील काही भागात परिस्थिती तणावपूर्ण बनली. काही भागत दगडफेकीच्या घटनाही घडल्या. त्यामुळे प्रशासनाने बुधवारी इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेतला होता

कोल्हापुरात इंटरनेट सेवा सुरळीत

कालपासून शहरातील विविध भागातील दुकानं उघडण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चाैक येथे पाेलिसांचा बंदाेबस्त आहे. शहरातील बस थांबे येथे नागरिकांची वर्दळ आहे. आज सकाळी शहरातील काही भागातील इंटरनेट सेवा सुरळीत झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात 19 जून पर्यंत जमाबंदीचे आदेश

पोस्ट व्हायरल होऊ नये व स्टेटसमुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात येऊ शकतो. अहवालानुसार अप्पर जिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी 19 जूनच्या रात्री बारा वाजेपर्यंत जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केला आहे त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा जादा लोक एकत्र जमा होणे, जमाव जमवणे, मिरवणुका काढणे, सभा घेण्यास बंदी आहे तसेच लाठ्या-काठ्या व शारीरिक इजा करतील अशा वस्तू, दगड, प्रतिमांचे प्रदर्शन, आवेश पुर्ण भाषणे, हा भाव करणे आधी प्रकरणांना मनाई करण्यात आली आहे