राज्यात अचानक औरंग्याची पैदास वाढू लागलीय. ती ज्यांनी जन्माला घातलीय, त्या महाविकास आघाडीच्या पैदावारांचा डीएनए आणि औरंगजेबाचा डीएन एकच असावा. असा टोला चित्रा वाघ यांनी कोल्हापूर आणि अहमदनगरमधील तणावपूर्ण परिस्थितीवर लगावला. काही तरूणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्या प्रकरणी राज्यातील परिस्थिती संवेदनशील असताना महाविकास आघाडीच्या वाचाळवीरांकडून दंगे भडकवण्याचं काम झालं नसतं. हे सगळं ठरवून केलं जातंय, हे जनताही पाहतेय.
चित्रा वाघ म्हणाल्या, हे सगळं ठरवून केलं जात आहे. यासाठी त्यांनी कट केला आहे. परंतु हे सगळं जनता पाहतेय. ‘ये पब्लिक है, ये सब जानती हैं’. महाविकास आघाडीचे नेते सर्वज्ञानी संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांनी तर खरंच आपला डीएनए एकदा टेस्ट करून घ्यावा. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, त्यांनी औरंग्याच्या औलादींचा बंदोबस्त करावा, ही निजामीवृत्ती आज ठेचली तरच कायमची अद्दल घडेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
चित्रा वाघ यांनी या दोन्ही घटनांवरून महाविकास आघाडीकडे बोट दाखवलं आहे. चित्रा वाघ यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, राज्यात अचानक औरंग्याची पैदास वाढू लागली आहे. ती ज्यांनी जन्माला घातली आहे त्यांचा म्हणजेच महाविकास आघाडीचा आणि औरंगजेबाचा डीएनए एकच असावा. अन्यथा काही तरूणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याप्रकरणी राज्यातील परिस्थिती संवेदनशील असताना महाविकास आघाडीच्या वाचाळवीरांकडून दंगे भडकवण्याचं काम झालं नसतं.
