विचारांची लढाई विचारांनीच लढावी लागेल – नितेश राणे

सोशल मीडिया इनफ्लुंसरसोबत बैठक 2024 मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक अतिशय महत्त्वाची असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. कोणी आमच्या वाटेला निष्कारण जात असेल तर आम्ही त्याला अजिबातही सोडणार नाही असा आक्रमक इशारा देत विचारांची लढाई विचारांनीच लढावी लागेल असे स्पष्ट मत अमरावती लोकसभा प्रभारी आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले. स्थानिक मानसरोवर येथे आज सोशल मीडिया इन्फ्लूनसरसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.अमरावती लोकसभेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवा. कर्नाटकात अराजकता तयार होत आहे. सत्तांतर झाल्यानंतरचा हा बदल लक्षात घेण्यासारखा असल्याचेही आ.नितेश राणे यांनी नमूद केले.

नऊ वर्षात केलेल्या कामाचा आलेख मोठा – खा. डॉ.बोंडे

सोशल मीडियाचा वापर करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेली काम त्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. नउ र्षात केलेल्या कामाचा आलेख हा फार मोठा आहे, असे खा.डॉ.अनिल बोंडे यांनी सांगितले. त्यामुळे इन्फ्लूनसर म्हणून आपण काळजीपूर्वक सोशल मीडिया वापरून 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी, असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले.

सत्याची बाजू जनतेला सांगा -आ.केळकर

सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार होत आहे. अशा अपप्रचाराला आपण आळा घालने आवश्यक आहे. लोकांना सत्याची बाजू सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा असे आमदार संजय केळकर यावेळी म्हणाले. नऊवर्षात एकही घोटाळा नसल्याने संपूर्ण विरोधी पक्षातील नेते अस्वस्थ झाले आहेत. जनमत-जनमन सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या व्यक्तींना वेळीच पाय बंद घालण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले