राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मागील महिन्यात पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर तीन दिवसांनी त्यांनी राजीनामा मागे घेतला. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबत कार्यकारी अध्यक्षपद निर्माण करण्यासंदर्भात चर्चा झाली. परंतु त्याला मंजुरी मिळाली नव्हती. अखेर शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठ्या फेरबदलांची घोषणा केली आहे. म्हणजेच शरद पवार यांनी दिल्लीत बसून भाकरी फिरवली आहे. यावेळी प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यांवर मोठी जबाबदारी दिली आहे. परंतु अजित पवार यांना कोणतीही जबाबदारी दिली नाही.
प्रफुल्ल पटेल – मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा या राज्यांची जबाबदारीप्रफुल्ल पटेस, सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा करताना सुनील तटकरे आणि जितेंद्र आव्हाड यांना देखील जबाबदारी देण्यात आली आहे. नील तटकरे यांच्याकडे ओदिशा, पश्चिम बंगाल, शेती, अल्पसंख्याक या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर जितेंद्र आव्हाडांनी बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, कामगार या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवारांना मात्र कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. अजित पवार या घोषणेवेळी दिल्लीत उपस्थित होते. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर शरद पवार अध्यक्ष आणि सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्ष करावेत अशी चर्चाही पक्षात सुरू झाली होती. मात्र, या सर्व चर्चांना शरद पवारांनी आज वर्धापन दिनी पूर्णविराम दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी २ मे रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून अजित पवार वगळता इतर सर्वांकडून मोठा दबाब आला. अजित पवार शरद पवार यांच्या राजीनाम्याचे समर्थन करत होते. त्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या अन् नेत्यांच्या आग्रहामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५ मे रोजी त्यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर केला. त्यानंतर शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला.
सुप्रिया सुळे – महाराष्ट्र, हरयाणा, पंजाब, महिला, युवक-युवती आणि लोकसभा निवडणूक नियोजनाची जबाबदारी
सुनील तटकरे – ओडिशा, पश्चिम बंगाल आणि राष्ट्रीय समितीची सत्र, परिषदा, निवडणूक आयोगाच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, अल्पसंख्याक विभाग या जबाबदाऱ्या
जितेंद्र आव्हाड – बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, लेबर विभाग, एससी, एनटी, ओबीसी विभाग
