संजय राऊत महाराष्ट्राला लागलेली कीड, शिवसेनेचे आमदार संजय सिरसाट यांची टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नांदेड दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले असा हल्लाबोल अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर केला होता. यावर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही शाहांवर टीकेचे बाण सोडले होते. संजय राऊतांनी अमित शाहांवर केलेल्या टीकेवरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

ठाकरे गटाने बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली मातीत गाडलं. ज्या काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचं नव्हतं पण ते गेले. आम्ही कोणाच्या मांडीवर जाऊन बसलो नव्हतो, ते गेले. सिल्वर ओकला नतमस्तक झाले. आम्ही नाही नतमस्तक झालो आम्ही स्वाभिमानाने लढलो. शिवसेनाप्रमुख दैवत असल्याने आम्ही ताठ मानेने बोलतो. आम्हाला झुकावं लागत नाही. ज्या मातोश्रीवर अमित शाह यायचे, नरेंद्र मोदी यायचे, राष्ट्रपती पदाचे उमेदवार यायचे ती मातोश्री लोकांच्या दारावर कटोरा घेऊन जाते याचं दुःख आम्हाला होतंय. त्यामुळे करणारा करविते संजय राऊतांसारखा पागल लोक आहेत या देशात. महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली ही कीड आहे. या किडीमुळेच ठाकरे गटाचं अधःपतन झालं आहे. म्हणून त्यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा उद्धव ठाकरे जोवर यांच्या पाठीत लाथ घालत नाही तोपर्यंत त्या पक्षाला चांगले दिवस येणार नाहीत अशी खरमरीत टीका संजय शिरसाटांनी यावेळी केली.

अमित शाहांनी काय केली होती टीका?

देशभरात भाजपातर्फे मोदी @9 अभियान राबविले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पहिली सभा शनिवारी नांदेडमध्ये पार पडली. तेव्हा बोलताना अमित शाह यांनी म्हटलं ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपाबरोबर निवडणूक लढवली होती ते हिंदुत्व आता कुठं आहे. केवळ सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले

अमित शाहांनी ठाकरे गटावर टीका केल्यानंतर संजय राऊतांनी प्रत्यूत्तर दिलं होतं. “अमित शाह यांना ठाकरे गटाचा धसका घेतला आहे असं संजय राऊत म्हणाले होते. यावर संजय शिरसाट म्हणाले की संजय राऊत यांनी ही टीका केलेली नाही. त्याला चोमडेपणा म्हणतात आमच्या मराठीत कोणाची तळी कशी उचलायची याचा प्रयोग संजय राऊत यांनी केला आहे. कसला धसका घेतला आहे? अमित शाह कुठे उद्धव गट कुठे? कुठेतरी बरोबरी करा, तुलना करा ना. परंतु, यांनी दरवेळेला ठाकरेंच्या कानात सांगून सांगून आपला रुबाब मोठा, आपण मोठे आहोत.