ठाकरे-रवींद्र वायकर परिवार घोटाळा, आधी 19 बंगलो गायब आत्ता कागदपत्र गायब; किरीट सोमय्या यांचा आरोप

उद्धव ठाकरे – रवींद्र वायकर परिवाराच्या 19 बंगलो घोटाळ्यात आधी 19 बंगलो गायब झाले. आत्ता कागदपत्र गायब झाल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे.सोमय्या म्हणाले, अलीबागच्याकोर्लई ग्रामपंचायतीतील 01/02/2011 ते 25/11/2017 दरम्यानचे महत्वाचे कागदपत्र, दस्तऐवज गायब झाले आहेत. याबाबत रेवदंडा पोलिस स्टेशन येथे ग्रामसेवक चेतन मगर यांनी 12 जून रोजी तक्रार दाखल केली आहे.