मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर मोठा अपघात; चौघांचा होरपळून मृत्यू

मुंबई- पुणे एक्स्प्रेसवर मोठा अपघात झाला आहे. एक्स्प्रेसवर वे वर केमिकल टँकरला आग लागली आहे. या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाला आहे. एक्स्प्रेसवर लोणावळा हद्दीत कुने गावाच्या ब्रीजवर एका टँकरला ही भीषण आग लागली. मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे. यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली असून आग विझविण्यास यश आले आहे. केमिकल टँकर पुलावर असताना लागलेल्या या आगीमुळे पुलाखालून जाणाऱ्या गाड्यांची हानी झाली आहे. पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर तब्बल पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत.

खंडाळ्यात लागलेली ही आग एका ब्रिजवर लागली आहे. या आगीच्या झळा खालील रस्त्यावर पोहचल्या. खंडाळ्यातील जुन्या मार्गावरील अन्य 2 वाहनांनी पेट घेतला आहे. त्यामुळेच एक महिला गंभीर जखमी झाली आहे. आग लागल्यानंतर पहिल्या अर्ध्या ते पाऊण तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर किमान तासभर तरी वाहतूक सुरळीत करण्यासाठी लागेल असं पोलिसांनी म्हटलं आहे. जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि एक्सप्रेसवे या अपघातामुळे ठप्प झाला होता. पोलिस यंत्रणा, देवदूत यंत्रणा आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. एकाच वेळी 3 वाहनांना आग लगल्याची माहिती मिळत आहे. ही आग विझवण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन जाणाऱ्या टँकरला ब्रिजवर आग लागली. ही आग इतकी भीषण होती की तिच्या झळांमुळे ब्रिजखालील 2 वाहनांनी पेट घेतला. जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील ज्या 2 गाड्यांना आग लागली त्यापैकीच एका गाडीमध्ये ही महिला बसली होती. अचानक गाडीला आग लागल्याने तिला बाहेर पडता आलं नाही. त्यामुळेच ती होरपळली.

केमिकल घेऊन भरधाव वेगात निघालेल्या टँकरच्या चालकाचा ताबा सुटला, यामुळं टँकर स्लिप झाला, या अपघाताने टँकर रस्त्यावर आडवा झाला. मग त्यातील केमिकल रस्त्यावर पसरले, खालून जाणाऱ्या मार्गावर ही केमिकल पसरले. त्यानंतर टँकरला आग लागली. खालील मार्गावर काम करणाऱ्या चार व्यक्तींवर हे केमिकल पडले आणि तेही या आगीत होरपळले. या आगीत 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील टँकरला लागलेल्या आगीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केलं आहे. ते ट्वीटमध्ये म्हणाले की, “मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत तीन जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. राज्य पोलिस दल, महामार्ग पोलिस, आयएनएस शिवाजी, अग्निशमन दल अशा सर्व यंत्रणा घटनास्थळी असून आता आग आटोक्यात आली आहे. एका बाजूने वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून, दुसराही मार्ग लवकरच सुरू होईल. राज्य सरकार स्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे.”