राज्यभरातून आषाढी वारीसाठी वारकरी पंढरपूरला जात आहेत. काही लोक पायी जातात. तर काही लोक बसने, रेल्वेने जातात. तर आता वारीमुळे रेल्वे बस तुडूंब भरलेल्या असतात याच पार्श्वभुमीवर विदर्भातील वारकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विदर्भातून तीन विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. या रेल्वे गाड्या नागपूर, अमरावती व खामगाव या तीन ठिकाणांहून सुटणार आहेत. या तीन विशेष रेल्वे गाड्यांना विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात थांबा देण्यात आल्यानं वारकऱ्यांचा पंढरपूरचा प्रवास सुकर होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली होती.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातून विशेष रेल्वे सोडण्यात याव्यात अशी मागणी केली होती. गडकरी यांच्या मागणीला रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. विदर्भातून आता वारीसाठी तीन विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. या रेल्वे नागपूर, अमरावती आणि खामगावमधून सोडण्यात येणार आहेत. विशेष म्हणेज विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात या रेल्वे गाड्यांना थांबा असल्यामुळे वारकऱ्यांची मोठी सोय झाली आहे. यामुळे एसटी बसला होणारी गर्दी देखील नियंत्रणात येणार आहे.
दरम्यान नितीन गडकरी यांनी पाठवलेल्या पत्राची दखल घेत रेल्वे मंत्रालयाकडून वारकऱ्यांसाठी तीन विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
