युवक काँग्रेसमधील कार्यकर्त्यांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. युवक काँग्रेसच्या बैठकीत दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. दोन गटात तुफान हाणामारी होताना कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या देखील फेकून मारल्या आहेत. यामुळे बैठकीत एकच तणाव निर्माण झाला.याबाबत मिळालेली माहिती अशी, या बैठकीत कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्यांची फेकाफेक केली. युवक अध्यक्ष कुणाल राऊत यांच्याविरोधात काही कार्यकर्ते भिडले. शिवराज मोरे या गटाने कुणाल राऊत यांचा विरोध केला.
मिळालेल्या माहितीनुसार, युवक काँग्रेसच्या बैठकीत दोन गटात तुफान हाणामारी झाली. कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या. युवक अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात काही कार्यकर्ते भिडले. शिवराज मोरे आणि अनिकेत म्हात्रे या गटाने कुणाल राऊत यांचा विरोध केला.युवक काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या कामकाजावर या गटाने व्यक्त केली. या गटाने त्यांना बदलण्याची मागणी केली. त्यानंतर या बैठकीत काही कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे या बैठकीत दोन गट एकमेकांना भिडले.
कुणाल राऊत यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यात आली. युवक काँग्रेसच्या चार उपाध्यक्षांनी कुणाल राऊत यांना महाराष्ट्र अध्यक्षपदावरून बदलण्याची मागणी केली. यानंतर बैठकीत तणाव निर्माण झाल्याचे दिसले. कार्यकर्ते आक्रमक झाले. एकमेकांवर खुर्च्या फेकल्या. त्यामुळे बैठकीत तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती सर्वत्र पसरली. त्यानंतर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते या राड्याची कशी दखल घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
