पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात मध्ये आणीबाणीची आठवण करून दिली आणीबाणी भारताच्या इतिहासातील काळा अध्याय आहे असे वर्णन केले आणि सांगितले की आमची लोकशाही मानसिकता असल्याने आणीबाणीच्या अखेरीस मजबूत विजय झाला असे मोदींनी सांगितले.
आजच्या पिढीतील तरुणांना हे जाणून आचार्य वाटेल की त्यांच्या पालकांचा जगण्याचा अधिकार त्यांच्या तारुण्यातच राहून घेतला होता 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली यामध्ये देशातील नागरिकांकडून सर्वाधिकार काढून घेण्यात आला यावेळी कलम 21 रद्द करण्यात आली होती त्यामुळे भारतातील लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न झाला होता.
तसेच त्यांनी या काळात स्वतः कशाप्रकारे संघर्ष केला असे सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले त्यांनी गुजरात में या नावाचे पुस्तक लिहिले होते तसेच आणीबाणीवर लिहिल्या गेलेल्या अनेक पुस्तकांचा त्यांनी उल्लेख केला मात्र नुकतेच लिहिल्या गेलेल्या टॉर्चर ऑफ पॉलिटिकल प्रिझनर्स पुस्तकांचा विशेष उल्लेख केला आहे ते पुढे बोलताना म्हणाले देशाच्या स्वातंत्र्याचा आज आपण अमृत काल साजरा करत आहोत यावेळी आपण देशाच्या स्वातंत्र्याला धोक्यात आणणाऱ्या आणीबाणीचा निश्चित अवलोकन करायला हवे असे आवाहन देखील नरेंद्र मोदी यांनी केले, जेणेकरून युवा पिढीला लोकशाहीचे महत्त्व समजण्यासाठी सोपे जाईल असे ते म्हणाले
