योगदिनानिमित्त विविध योगासाने सर्व आजारांवर एकच उपचार, करा योग रहा निरोगी असा संदेश देत निरोगी व चैतन्यमय आयुष्यासाठी योग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केले. स्थानिक हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी हजारो विद्यार्थ्यांसह विविध योगासने केली. जगभरात जागतिक योग दीन उत्साहात साजरा होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात योगाला जागतिक स्तरावर व्यासपीठ मिळाले. योगाचे महत्त्व प्रधानमंत्री यांनी जगभरात पोहोचवून भारताची संस्कृती उंचावण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात योगाला महत्त्वाचे स्थान द्यावे निरोगी व आनंददायी आयुष्यासाठी योग करणे फार आवश्यक आहे, असेही खासदार डॉ.अनिल बोंडे यावेळी म्हणाले. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव माधुरीताई चेंडके यांच्यासह हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागतिक योग दिनानिमित्त अमरावती शहरात विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांना खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी भेटी दिल्या. त्यामध्ये विभागीय क्रीडा संकुल येथे पतंजली योग विद्यापीठाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी सहभागी होत योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. शारदानगर येथील कार्यक्रमात त्यांनी सहभाग दर्शवला
