“मुंबई महापालिकेतील एसआयटी चौकशीतून अनेकांचा बुरखा फाटणार आहे. अनेकजण उघडे पडणार आहेत. त्यामुळेच वैफल्यातून आक्रोश व्यक्त केला जात आहे. उद्धव ठाकरे बावचळल्यासारखे बोलत आहेत असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी १ जुलैला शिवसेना महापालिकेवर मोर्चा काढणार आहे, अशी घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. यावरून उद्धव ठाकरेंना टोला लगावतना फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंचा आक्रोश मी समजू शकतो. त्यांच्या नेतृत्त्वात मुंबई महापालिकेत १२ हजार ५०० कोटींचा जो भ्रष्टाचार झाला, त्यावर कॅगने ताशेरे ओढले आहेत. मुख्यमंत्री शिंदेंनी एसआयटी चौकशीची घोषणा केली. त्या चौकशीतून अनेकांचे बुरखे फाटणार आहेत आणि अनेकजण उघडे पडतील,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
उद्धव ठाकरेंच्या आशिर्वादात जी गँग काम करीत होती, त्या गँगचे आता काही खरे नाही, असे त्यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांचा आक्रोश स्वाभाविक आहे,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
