मातोश्रीपासून वरळी पर्यंतही गेला नाहीत आणि मोदीजींना विचारता; देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मातोश्रीवरून वरळीला जाऊ शकले नाहीत. तुम्हाला मोदींवर बोलण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केला.सातारा जिल्ह्यातील सभेत बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला.शिवसेना वर्धापन दिनात बोलताना त्यांचा ऑडिओ ऐकवून उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली होती. यावर फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे म्हणतात मोदींनी लस तयार केली काय? तुम्ही राज्य चालवता असे म्हणायचा म्हणजे काय घोड्यावरून फिरत होता की सरकार बैलगाडीसारखं हाकत होता काय?

कोरोना काळात अन्नाविना एक मृत्यू झाला नसल्याचे सांगून फडणवीस म्हणाले शेतकरी सन्मान योजनेत केंद्राचे 6 आणि राज्याचे 6 असे 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. या सरकारच्या आधीच्या अडीच वर्षाच्या सरकारने एक पैसा देखील दिला नाही, आपण आता प्रकल्पांना निधी उपलब्ध करून दिला. 2019 साली मी सोडून गेलेल्या योजना आहे तिथंच आहेत. इथल्या योजना देखील माझी आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची वाट बघत असतील.