पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण होणे बंधनकारक; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

नव्या शिक्षण धोरणानुसार सरसकट आठवीपर्यंत उत्तीर्ण करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. याऐवजी आता पाचवी आणि आठवी इयत्तेत वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत विद्यार्थी नापास झाला तर त्याला त्याला पुन्हा परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेतही त्याला पास होता आलं नाही तर तो पाचवी आणि आठवी ज्या वर्गात असेल त्याच वर्गात राहील. मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांनी आठवीपर्यंत नापास करता येत नव्हते. मात्र आता अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पुनरपरीक्षेची संधी देण्यात येणार आहे. तरीही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले तर त्यांना त्याच वर्गात राहणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

राज्य सरकारने आज जारी केलेल्या आदेशानुसार, आता पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे. इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास पुनर्परीक्षेचा पर्याय विद्यार्थ्याला देण्यात आला आहे. पुनर्परीक्षेतही विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण झाल्यास इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गातच त्या विद्यार्थ्याला ठेवले जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार, पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना पाचवीच्या वर्गासाठी निश्चित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायदा २०११ मध्ये सुधारणा करताना मोठा निर्णय घेतला. यामध्ये पाचवी आणि आठवी इयत्तेसाठी वार्षिक परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागेल. जर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना पुन्हा संधी दिली जाईल. मात्र त्यातही पास होता न आल्यास विद्यार्थ्याला आहे त्याच वर्गात ठेवलं जाणार आहे. पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुसार प्रवेश देण्यात येईल. तर सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरुप प्रवेश देताना पाचवीची वार्षिक परीक्षा उत्तीर्ण करणं बंधनकारक असणार आहे.

विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही तर त्या विद्यार्थ्याला अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यात त्याची पुनर्परीक्षा घेतली जाईल. पुनर्परीक्षेत देखील संबंधित विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा पाचवी किंवा आठवीच्या वर्गात ठेवले जाईल. प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढले जाणार नाही, असे देखील या देशात नमूद करण्यात आले आहे.