राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १ जानेवारी २०२३ पासून ही वाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहे.
राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केली आहे. दरम्यान, राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सध्या ३८ टक्के महागाई भत्ता मिळतो. त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याने महागाई भत्ता ४२ टक्के इतका झाला आहे. विशेष बाब म्हणजे, १ जानेवारी २०२३ पासून ही वाढ लागू करण्यात आली असून, पाच महिन्यांच्या थकबाकीसह जूनच्या वेतनापासून देण्यात येणार आहे.त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांची थकबाकीही रोखीने देण्यात येणार आहे. वित्त विभागाने त्यासंबंधीचा शासन आदेश शुक्रवारी प्रसृत केला.
राज्यातील १७ लाख शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने ३ एप्रिल २०२३ त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4 टक्के वाढ केली होती. डीए आणि डीआरएमध्ये ही वाढ
