राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर आता राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून शरद पवार हे कराड येथे रवाना झाले. त्यामुळे आता शरद पवार पुन्हा ॲक्शन मोड वरती आलेच दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता या मंत्र्यांचा खाते वाटपाबाबत आज चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्या येत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीने सेना आणि भाजपकडे चांगल्या खात्याची मागणी केल्याचेही समोर येत आहे. नव्या मंत्र्यांना मिळणाऱ्या खात्यावरुन शिंदे गट अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे. भरत गोगावले यांनी ही नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. थोडीशी नाराजी आहेच मात्र वस्तुस्थिती स्वीकारावी लागेल. एक भाकरी मिळणार होती मात्र आता अर्धीच मिळणार. नाराज होऊन आता काय करणार, असे गोगावले यांनी म्हंटले आहे.
अजितदादा पवार हे महाविकास आघाडीत अर्थमंत्री होते. त्यावेळी अजित पवार यांनी निधी दिला नसल्याचा आरोप शिंदे गटाने केला होता. निधी मिळत नसल्यानेच आम्ही शिवसेना सोडत असल्याचंही शिंदे गटाच्या आमदारांनी म्हटलं होतं. त्याचीच पुनरावृत्ती आता होऊ नये म्हणून शिंदे गटाने अजितदादा पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास विरोध केल्याची माहिती समोर येत आहे.
कुणाला कोणती खाती मिळणार?
●अजित पवार – महसूल
●दिलीप वळसे पाटील – सांस्कृतिक आणि कृषी
●छगन भुजबळ – ओबीसी आणि बहुजन विकास
●हसन मुश्रीफ – अल्पसंख्याक आणि कामगार
●धनंजय मुंडे – सामाजिक न्याय
●धर्मराव बाबा – आदिवासी कल्याण
●आदिती तटकरे – महिला आणि बालविकास
●अनिल पाटील – पशु व वैद्यकीय
