सोनी कुटुंबीयांची सांत्वन पर भेट हिंदूंच्या सन उत्सवाच्या कार्यक्रमात सक्रियपणे काम करणारा, विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता मनोज सोनी यांची हत्या ही शुल्लक कारणातून झालेली नसून ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात आडकाठी आणल्यानेच त्यांचा प्री प्लान मर्डर केला असल्याचा गंभीर आरोप राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केला आहे. स्थानिक भाजी बाजार परिसरात राहणाऱ्या मनोज सोनी यांची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आज डॉ. बोंडे यांनी सोनी यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देत कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले.
खोलापुरी गेट पोलिस स्टेशनच्या परिसरात येणाऱ्या तारखेड परिसरात १ जुलै रोजी रात्री १२ ते १ च्या सुमारास मनोज सोनी यांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी आज मंगळवारी भाजी बाजार परिसरातील मनोज सोनी यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी त्यांनी सोनी यांच्या पत्नी व मातोश्री यांच्याशी संवाद साधत शोक व्यक्त केला. सोनी कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे देखील सांगितले. तर यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, परिसरात राहणाऱ्या नागरिकांशी व सोनी यांच्या आप्तेष्टांशी चर्चा केल्यावर शुल्लक वादातून झालेली ही हत्या दिसत नाही हा प्रि प्लॅन केलेला हा मर्डर दिसतो, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
प्रकरणातील व्याप्ती शोधून काढावी
मनोज हिंदूंच्या सनोत्सवामध्ये सक्रियपणे काम करत होता. परिसरातील एक युवती लव्ह जीहादच्या सापड्यामध्ये अडकू नये यासाठी तो प्रयत्नशील होता. त्या युवतीचा व संबंधित युवकाचा व्हिडिओ सुद्धा पोलिसांना प्राप्त झाला आहे. पोलिसांनी केवळ युवकांना अटक करून समाधान मानले तर प्रकरणाची व्याप्ती समोर येणार नाही. उमेश कोल्हे हत्याप्रकरणी सुद्धा सांगितले होते, मात्र शिल्लक असलेली देणी परत करण्याच्या वादातून त्याचा खून झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. पुढे तो केंद्रीय तपास यंत्रणांनी खोटा ठरविला. पोलिसांना या प्रकरणाची गुंतागुंत शोधून काढायची आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा यासंदर्भात माहिती देणार असल्याचे डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.
