शरद पवार साहेब तुम्ही धनंजय मुंडेंना इकडे आणले त्यावेळी गोपीनाथ मुंडे-बहीण पंकजा यांच्या डोळ्यातही असेच अश्रू आले

राज्यात राजकीय भूकंपानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बैठका पार पडत आहेत.यानुसार कोणाकडे किती संख्याबळ आहे याबाबतचे चित्र स्पष्ट झाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वातावरण ढवळून निघालेले असतानाच राष्ट्रवादीतील दोन्ही गटांच्या बैठका आज होत आहेत. या बैठकांनी राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे.अजित पवार यांच्या गटाची बैठक सुरू झाली असून या बैठकीत ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारणावर जोरदार प्रहार केले.तसेच पक्षातून बाजूला होऊन शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा का दिला याचही उत्तर दिले.

भुजबळ म्हणाले, पवार साहेब आमच्यासाठी विठ्ठल असून, त्यांना बडव्यांनी घेरले आहे. घेरलेल्या बडव्यांना बाजूला सारत साहेबांनी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी याव अशी आर्त विनवणीदेखील भुजबळांनी यावेळी केली. भुजबळांच्या या वक्तव्याचा रोख जयंत पाटील यांच्याकडे असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

अजून बरेच आमदार आमच्याकडे आहेत. या गोष्टीची बऱ्याच दिवसांपासून तयारी सुरू होती. एका दिवसांत घेतलेला हा निर्णय नाही, असं म्हणत भुजबळांनी शरद पवार गटाला प्रत्युत्तर दिलं आहे. अजित दादांनी शरद पवारांसमोर नाराजी व्यक्त केली होती. आम्हाला विचारून निर्णय घेतले जात नाहीत, अशी टीका छगन भुजबळांची नाव न घेता सुळे, पाटलांवर केली आहे.

छगन भुजवळ म्हणाले की आताची ही परिस्थिती पाहून साहेबांना वाईट वाटणं साहजिक आहे.पण साहेब आपण वसंतदादांना सोडलं त्यांनाही असंच वाईट वाटलं. बाळासाहेबांनाही मी सोडलं,तेव्हाही असंच वाईट वाटलं. धनंजय मुंडेंही इकडे आले. त्यावेळी गोपीनाथ मुंडे आणि बहीण पंकजा यांच्या डोळ्यातही असेच अश्रू आले.

अजित पवार यांच्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदार आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर सह्या झाल्या आहेत. बुधवारी बैठकीला सर्व आमदार आले नाही. कारण काही विदेशात आहेत. काही आजारी आहेत तर काही वाहतूक कोंडीत अडकले आहेत, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.

ते पुढे म्हणाले, 1999 साली आम्ही काँग्रेस सोडली. राष्ट्रवादी स्थापन केली त्यानंतर परत काँग्रेस सोबत गेलो. मंत्रिमंडळात सामील झालो. त्यानंतर मात्र असं काय झालं. आम्ही एकत्रित निवडणुका लढत होतो. पण, 2014 साली वेगळे लढण्याचं कारण काय हे कळंल तर बीजेपीने शिवसेना सोडली म्हणून इकडे राष्ट्रवादीने काँग्रेस सोडला पण, का याचं उत्तर काही मिळालं नाही. अचानक असे निर्णय कसे होतात असा सवाल भुजबळ यांनी केला.