शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांची खाजगी प्रॉपर्टी आहे का ?आम्ही फोटो वापरणार – अमोल मिटकरी

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप झाला. २ जुलै २०२३ या दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बैठका मुंबईत पार पडल्या.पहिली बैठक अजित पवार गटाची होती तर दुसरी शरद पवार गटाची.अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो वापरण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. अजित पवार यांच्या समर्थकांकडून शरद पवारांचे फोटो वापरण्यात येत आहेत.फोटो वापरणाऱ्यांना शरद पवारांनीही थेट इशारा दिला आहे.तसेच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांचा फोटो वापरण्यास आक्षेप घेतला होता.यानंतर आव्हाडांना आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शरद पवार यांचा फोटो वापरला होता. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “जिवंत माणूस जेव्हा सांगतो, माझे फोटो वापरायचे नाहीत. तर, विषय संपला. तुमच्याकडे आहेत, ना तुमचे राष्ट्रीय नेते दिल्लीचे वगैरे. त्यांचे फोटो वापरा. शरद पवार कशाला पाहिजेत?, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.

यावर अमोल मिटकरी यांनी आव्हाडांना खडसावले आहे. ते म्हणाले की, शरद पवार जितेंद्र आव्हाडांची खासगी मालमत्ता नाही आहेत. शरद पवार सर्वांचे आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी अशी वक्तव्ये करू नये,अशा शब्दांत अमोल मिटकरींनी खडसावले आहे.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड म्हणाले की जिवंत माणूस जेव्हा सांगतो, माझे फोटो वापरायचे नाहीत. तर, विषय संपला. तुमच्याकडे आहेत, ना तुमचे राष्ट्रीय नेते दिल्लीचे वगैरे. त्यांचे फोटो वापरा. शरद पवार कशाला पाहिजेत?

फोटो वापरायला शरद पवारांचा नाकार

मी ज्या राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत.त्यांनीच आमचे फोटो वापरावे.ज्यांनी आमच्या विचारसरणीचा विश्वासघात केला त्यांनी माझा फोटो वापरू नये.माझा फोटो कुणाला वापरू द्यायचा, हा माझ्या हयातीत तरी माझाच निर्णय आहेअसे शरद पवारांनी सांगितले आहे.