माझ्या मागे मोदी-शाहांची शक्ती, सरकार पडणार या निव्वळ अफवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पावरांसह काही आमदारांनी बंडखोरी करून शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पावरांच्या या सत्तेतील सहभागामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.अशातच आता राष्ट्रवादीला सरकारमध्ये सोबत घेताना विश्वासात घेतले नसल्याची खंत माजी मंत्री आणि शिंदे गटाचे सहयोगी आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे…

अजित पवारांना सत्तेत सहभागी करुन घेतल्याने शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ANI ला दिलेल्या मुलाखतीत, एकनाथ शिंदे यांनी विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले आहेत. अजित पवारांना जेव्हा युतीत घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी, देवेंद्र फडणवीस आणि इतर वरिष्ठांनी विश्वासात घेऊन निर्णय घेतला अशी माहिती दिली.

सरकार बनवाताना आम्ही बाळासाहेबांची विचारधारा, हिंदुत्व यांना पुढे घेऊन जात आहोत. विकासाशी या सर्व गोष्टी जोडत आहोत. इतका विकास झाला आहे की, अजित पवारांनीही तो मान्य केला आहे. अजित पवार विकासालाच साथ देत आहेत. अजित पवारांचेही तेच विचार असून त्यासाठीच ते एकत्र आले आहेत. यापुढे अजून मजबूतीने काम होईल असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. ते म्हणाले त्यांच्या पक्षाची जी स्थिती आहे ती पाहिली पाहिजे.आत्मचिंतन करायला हवं.दुसऱ्याचं घर पाहण्यापेक्षा आपलं घर शाबूत आहे का ते पाहायला हवं.माझी काल आमदार, खासदारांसोबत बैठक झाली.आमच्या सरकारचा शपथविधी झाल्यापासून हे सरकार जाणार असं बोललं जात आहे. पण हे सरकार मजूबत होत चाललं आहे.

तिन्ही पक्षांचे मिळून सदस्य 200 च्या पुढे गेले आहेत.आम्हाला केंद्र सरकार, पंतप्रधानांचा पाठिंबा आहे. गृहमंत्रीही यात लक्ष्य घालतात. आमच्या प्रस्तावाला तात्काळ मान्यता दिली जाते. डबल इंजिन सरकार वेगाने काम करत असल्याने यांच्या पोटात दुखत आहे अशी टीका त्यांनी केली.

पुढे ते म्हणाले की, शरद पवारांनी पक्ष उभारण्यासाठी जी मेहनत घेतली, त्यामुळे या बंडाचे दुःख मोठे आहे. शरद पवार साहेबांना झालेल्या वेदना कमी नाहीत. त्यांचे सांत्वन आम्ही करतो. या उठावाची सुरुवात उद्धव ठाकरेंनी केली. त्यानंतर शिंदे आणि आता अजित पवार यांनी केली आहे. सगळ्या उठावाचे भिष्मपिता शरद पवार आहेत.बंड शरद पवारांसाठी नवीन नाही. बदलत्या राजकारणात अजित पवार यांनी उचलेल पाऊल अभिनंदनास पात्र आहे,असेही बच्चू कडूंनी यावेळी सांगितले.