मशाल चिन्हावरच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. मात्र समता पार्टीकडे पुरेसे कागदपत्र नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली अआहे. सहा आठवड्यासाठी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी पुढे शिवसेना पक्षावर दावा केला. तसंच शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असणाऱ्या धनुषबाण चिन्हावरही त्यांनी दावा केला. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलं. तेव्हा अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक लागली. तेव्हा रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार होत्या. त्यामुळे ठाकरे गटाने नव्या चिन्हाची मागणी केली. मात्र या निवडणुकीपुरतंच ठाकरे गटाला मशाल चिन्ह वापरता येणार होतं. याबाबतच्या याचिकेवर आज सुनावणी झाली.
या अगोदर दिल्ली उच्च न्यायालयात उदय मंडल यांनी या संदर्भात अपिल केले होते. मात्र, न्यायालयाने मंडल यांची याचिका फेटाळली होती. शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिवसेनेचं चिन्ह धनुष्य बाण गोठवण्यात आले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धनुष्यबाण आणि शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात मिळालं होतं.
पक्षाचा जनाधार घटल्यानं निवडणूक आयोगाने समता पक्षाचं निवडणूक चिन्ह मशाल हे गोठवले होते. हे चिन्ह निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला तात्पुरत्या स्वरूपात दिले आहे. मात्र, कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचं चिन्ह गोठवल्यानंतर कोणत्याही पक्षाला दिलं जात नाही, असा दावा समता पार्टीने केला आहे. यावर सहा आठवड्याने सुनावणी होणार आहे.
