सहारा रिफंड पोर्टल लाँच, लाखो नागरिकांचे अडकलेले पैसे परत मिळणार; अमित शाह यांच्याकडून पोर्टल लाँच

सहारा सहकारी संस्थांच्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सहारा रिफंड पोर्टल लॉन्च केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सहाराच्या गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा परत मिळू शकणार आहे. पोर्टल लॉन्च करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, सरकारने गुंतणवूकदारांचा पैसा परत करण्यासाठी एक पाऊल टाकले आहे. अमित शाह यांनी म्हटले आहे की, ज्यांचे पैसे अनेक वर्षांपासून सहारा सहकारी संस्थांमध्ये अडकले आहेत, त्यांच्यासाठी आज खास दिवस आहे. सहारा इंडिया रिफंड पोर्टल लाँच करण्यात आलं आहे. या पोर्टलद्वारे गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

सहारा समुहाच्या गुंतवणुकीमध्ये लाखो भारतीय नागरिकांचे पैसे दिर्घकाळ अडकलेले आहेत. या कंपनीत अनेक लोकांनी सर्व बचत गुंतवली असून ही गुंतवणुकीची रक्कम परत मिळण्याची वाट पाहत होते. सहारा कंपनीच्या विविध योजनांमध्ये ग्राहकांनी पैसे जमा केले होते. सहारा समुहातीचे गुंतवणूकदार या प्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी करत होते. त्यानंतर आता केंद्र सरकारकडून गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. सहारा रिफंड पोर्टल सुरू झाल्यामुळे आता गुंतवणूकदारांना त्यांचे जमा पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सहारा इंडिया रिफंड पोर्टलद्वारे गुंतवणूकदार त्यांचे पैसे काढू शकतात.

सहारा समूहाच्या ज्या सहकारी संस्थांमध्ये हजारो कोटी रुपये अडकले आहेत, त्यात सहारा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह, सहारा युनिव्हर्सल मल्टिपर्पज, हमारा इंडिया क्रेडिट को-ऑपरेटिव्ह आणि स्टार्स मल्टिपर्पज यांचा समावेश आहे. सर्वाधिक पैसा सहारा क्रेडिट को-ऑपरेटिव्हमध्ये अडकलेला आहे. हे पोर्टल केवळ खऱ्या गुंतवणूकदारांसाठी योग्य ओळख आणि पुरावे सादर करण्यासाठी तयार करण्यात आले आहे, कारण पैसे देण्यापूर्वी दाव्यांची पडताळणी करणे आवश्यक आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने सहाराच्या एकापेक्षा जास्त कोऑपरेटिव सोसायटीमध्ये गुंतवणूक केली असेल तर त्याला रिफंडसाठी एकच क्लेम फॉर्म भरावा लागणार आहे. सहारा ग्रुप ऑफ कोऑपरेटिव सोसायटी क्लेम आवेदन जमा केल्यानंतर 30 दिवसांमध्ये त्याला सत्यापित करेल. पोर्टलवर क्लेम फॉर्म भरल्यानंतर 15 दिवसांमध्ये एसएमएसच्या माध्यमातून क्लेम स्टेटसची माहिती दिली जाईल. क्लेम प्रोसेस पूर्ण होण्यासाठी 45 दिवसांचा वेळ लागू शकतो.
पैसे परत घेण्यासाठी सहकार मंत्रालयाची वेबसाईट https://cooperation.gov.in वर असलेल्या CRCS-Sahara Refund Portal वर क्लिक करून लॉगईन करावं लागणार आहे. रिफंड मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांना कोणतीही फी द्यावी लागणार नाही.