नवी मुंबईचं एअरपोर्ट पुढच्या वर्षी सुरू करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

राज्याच्या मध्यवर्ती भागात मोठ्या एअरपोर्टची गरज असून कराड शहरात जमीन संपादन करण्यासाठी पुन्हा जोमाने प्रक्रिया राबवि ण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली आहे. नवीमुंबईचा विमानतळ पुढच्या वर्षी सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील अन्य ठिकाणी विमानतळ सुरु करण्याच्या योजनांची देखील त्यांनी यावेळी माहीती दिली.

मुंबई विमानतळाला एक सिंगल रनवे आहे. या सिंगल रनवेवर देशात सर्वात जास्त लँडींग आणि टेक ऑफ या विमानतळावर होतं. 700 हून अधिक विमानांचं लँडींग आणि टेक ऑफ या विमानतळावर होतात. मुंबई विमानतळाला सकाळचं स्लॉट देण्याची गरज नाही. पण नवी मुंबई विमानतळ पुढच्या वर्षीपासून सुरू होणार आहे. मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे गेलो होतो आणि त्या विमानतळाची पाहणी केली. रनवे देखील तयार झाला आहे. पावसाळ्यानंतर त्या रनवेचं फायनल कोटींग होईल. टर्मिनल बिल्डिंगचं काम देखील अत्यंत वेगानं होईल. त्यामुळे पुढच्या वर्षातील ऑगस्ट महिन्यात हे विमानतळ सुरू करण्यात सांगितलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई विमानतळाकडे दुपारचा टाईम स्लॉट उपलब्ध नसल्याने रिजनल कनेक्टीविटी साठी अडचणी येत आहेत. तसेच संभाजीनगरातील विमानतळासाठी जमीन संपादनासाठी 800 कोटी मंजूर झाले आहेत. त्यामुळे संभाजीनगरात मोठी विमाने उतरविणे सोपे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अकोला धावपट्टीसाठी लांबीसाठी जमिन मिळाली, परंतू रुंदीसाठी जमिन कमी पडली आहे. त्यामुळे आणखी जमिन संपादन करावे लागणार आहे. मुंबई एअरपोर्ट अथोरिटीसोबत एक उच्चस्थरीय बैठक घेतली जाईल. तसेच त्यांना तशाप्रकारचे निर्देश देऊन काही स्लॉट्स हे मिळवण्याचा प्रयत्न निश्चितपणाने केला जाईल. त्यामुळे राज्यातील विमान सेवा वाढवता येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.