विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून ‘नीलम गोऱ्हे’च राहणार; तालिका सभापतींचा निर्णय

पक्षांतर केल्याने विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना अपात्र ठरवावे हा शिवसेनेचा अक्षेप फेटाळण्यात आला आहे. सभापतीपदी असलेली व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधीत नसल्याचे स्पष्टीकरण करण्यात आले.विधानपरिषदेत विरोधकांनी नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्याने त्यांना पदावरून हटविण्याची मागणी केली होती. मात्र आज तालिका सभापती निरंजन डावखडे यांनी गोऱ्हे यांना अपात्र करता येणार नाही, तसेच त्या विधान परिषदेच्या उपसभापतीपदी राहतील असं म्हटलं आहे.\

नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटातून बाहेर पडल्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. मात्र, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यासह यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे ह्या शिवसेनेचा (उद्धव ठाकरे) राजीनामा देऊन शिंदे गटात सामील झाल्या. या घटनेवरून त्यांनी पक्षांतर केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळं पक्षांतर बंदी कायद्यातील विविध तरतुदीनुसार, त्यांना पदावरून अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी केली होती. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गोऱ्हे यांची बाजू घेत आक्षेप फेटाळून लावले होते.

पक्षातरांच्या बाबतीत घेतलल्या आक्षेपात सभापती किंवा उपसभापती यांनी पक्षांतर केले तर ते अपात्र ठरणार नाही. या पदाला तशी सूटही कायद्यात देण्यात आलेली आहे. निलम गोऱ्हे यांनी ज्या पक्षाला पाठिंबा दिला तो पक्ष बदलला नाही. चिन्ह व नाव हे त्याच पक्षाचे आहे. निलम गोऱ्हे यांनी १४ मे २०२० पासून ज्या पक्षाला पाठिंबा दिला आहे तो पक्ष बदलला नाही. चिन्ह आणि नाव हे त्याच पक्षाचे आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून निलम गोऱ्हे कायम राहतील. त्यांनी पक्षांतर केले अशी तरतूद किंवा नियम आढळून येत नाही. म्हणून उपसभापती म्हणून गोऱ्हे यांचे संविधानिक तरतूदीनुसार अधिकार अबाधित राहतील, असेही तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केले.