कर्जत येथील एन.डी.स्टुडिओमध्ये प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाईंची आत्महत्या! गळफास घेऊन जीवन संपवलं

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. मुंबईतील एन.डी स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली. गळफास लावून त्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. त्यांनी आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप समोर आले नाही.सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. एन. डी स्टुडिओमध्ये संपवल स्वत:चे जीवन. हिंदी, मराठी चित्रपटांसाठी दिग्दर्शन केलं. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. १९८७ सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. २००५ मध्ये नितीन देसाईंनी मुंबईजवळील कर्जत येथे एनडी स्टुडिओ सुरु केला.

कर्जतमधील एन.डी. स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं आहे.देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. जोधा अकबर,हम दिल दे चुके सनम,माचिस,देवदास,लगान,प्रेम रतन धन पायो’ या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन त्यांनी केलं. देसाई अनेक सरकारी कार्यक्रमाचं आयोजन देखील करायचे. अनेक शिवकालीन मालिकांचे कला दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. नितीन देसाई यांनी चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवला आहे, तर तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार प्राथमिक माहितीनुसार, नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केली. एनडी स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन देसाई दिसून आले. कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.