पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत गोवा-महाराष्ट्रातील एनडीए खासदारांची आज बैठक

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महाराष्ट्र राज्यातील खासदारांची आज (दि. ८ ऑगस्ट) बैठक पार पडणार आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मोदींच्या या क्लस्टर बैठका सुरू आहेत. आज सायंकाळी सहा वाजता या बैठकीचे आयोजन महाराष्ट्र सदनात बैठकीचे आयोजन केले आहे. संसदेच्या अधिवेशनामुळे महाराष्ट्रातील सर्व खासदार राजधानी दिल्लीत आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मंत्री नितीन गडकरी, मंत्री राजनाथ सिंह बैठकीला उपस्थित राहणार आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मिशन 45 चा नारा दिला आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस देखील भाजपसोबत असेल.

गोव्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील एक-एक जागाही महत्वाची असणार आहे. त्यामुळे भाजप चांगलीच तयारीला लागली आहे. गोव्यात सध्या दोन पैकी एक खासदार भाजपचा आहे. उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक हे भाजपचे खासदार आहे, ते केंद्रात राज्य मंत्रीही आहेत.तर दक्षिण गोव्यात काँग्रेसचे फ्रान्सिस्को सार्दिन हे खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 मध्ये दक्षिण गोव्याची जागाही भाजपकडे होती. ती जागा परत जिंकण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी गोव्यातील फोंडा येथे एक सभाही घेतली होती.

नरेंद्र मोदी एनडीएच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व 430 खासदारांना भेटणार आहेत. नरेंद्र मोदी विविध गटातील सर्व खासदारांना भेटणार आहेत. यामध्ये ते नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या खासदारांची भेट घेत आहेत.सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वासाठी महाराष्ट्र खूप महत्वाचा आहे. उत्तर प्रदेश खालोखाल महाराष्ट्रातून सर्वाधिक 48 खासदार येतात. महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या दोन वर्षात बऱ्याच उलथापालथी झाल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फुटले. उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट महाविकास आघाडीसोबत आहे. त्याचवेळी शिंदे गट आणि अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी आहे.