गेली काही दिवस कोोनाचे नाव ऐकू येत नसताना राज्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचे 109 रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. जुलैच्या शेवटापर्यंत राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 70 इतकी होती. पण 6 ऑगस्टला नोंदवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 115 इतकी होती. तर आज नोंदवण्यात आलेल्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 109 इतकी आहे.
दरम्यान कोरोनाच्या विळख्यातून जग सुटले असे वाटत असतानाच ब्रिटनमधून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. यापूर्वी EG.5.1 व्हेरिएंटमुळे इंग्लंडमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या व्हेरिएंटमुळे इंग्लंडमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. इंग्लंडमधील आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की, हा व्हेरिएंट ओमिक्रॉनपासून आला आहे.
पुणे शहरामध्ये मे महिन्यात या व्हेरीयंट एक रुग्ण आढळून आला होता. तेव्हाच त्याचे निदान करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा एक चिंताजनक माहिती समोर आली आहे.टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना जीनोम सिक्वेन्सिंगचे महाराष्ट्राचे समन्वयक आणि बीजे मेडिकल कॉलेजचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेश कार्यकर्ते म्हणाले, “राज्यामध्ये मे महिन्यात EG.5.1 म्हणजेच ओमीक्रोनचा नवीन व्हेरियंट आढळून आला होता.
यानंतर राज्यामध्ये या व्हेरियंटचा प्रभाव दिसलेला नाही. मात्र, सध्या राज्यात XBB.1.16 आणि XBB.2.3 व्हेरियंट सक्रिय होताना दिसत आहे. सध्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. सध्या पुण्यामध्ये 34 सक्रिय कोविड-19 रुग्ण आहे, तर मुंबईमध्ये ही रुग्णसंख्या 43 वर आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात जुलैच्या अखेरपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 70 वर होती. 06 ऑगस्टपर्यंत ही संख्या 115 वर जाऊन पोहोचली आहे.
