संजय राऊत यांना भविष्य सांगण्याची सवय लागली आहे. पण संजय राऊत यांच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत नाही, असे आमदार संजय शिरसाट यांनी म्हणत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांना आता काय काम धंदा राहिलेलं नाहीत. त्यांनी भविष्य सांगण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला असावा आधी सांगितले होते, एक महिन्यात सरकार पडेल मग म्हणाले दोन महिन्यात पडेल, सहा महिन्यात पडेल पण सरकार चालतंय त्यांचं पितळ ऊघडं पडलं त्यामुळे आता त्यांनी हेच काम करत राहावं पूर्ण बहुमताने हे सरकार पुन्हा सत्तेत येईल, असे म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी मोदींनी काय करायला हवं, याचा सल्ला देऊ नये, काय तेवढी त्यांची लायकी नाहीये, असेही ते म्हणाले.
मुंबईतील बेस्ट कामगारांच्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. गतिमान सरकारचे शिंदे हे मुख्यमंत्री आहेत.एखाद्या गोष्टीचा योगायोग असतो, कावळा बसायला आणि फांदी तुटायला, पण त्यामुळे आदित्य ठाकरेंना जर असं वाटतं असेल की त्यांनी ट्विट केलं आणि मग मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेऊन बेस्ट कामगारांच्या प्रश्नात लक्ष घातले. तर त्यांना त्या गैरसमजात राहू द्या. आदित्य ठाकरेंच्या ट्विटवर सरकार चालत नाही
उद्धव ठाकरे यांना काही काम नसल्यामुळे ते सातत्याने टोमणे मारत असतात. खरतर त्यांच्या टोमण्यांचा संग्रह केला पाहिजे,असा चिमटा देखील शिरसाट यांनी काढला. शरद पवार यांनी मी एनडीए सोबत जाणार नाही, असा विश्वास महाविकास आघाडी आणि देशपातळीवर होत असलेल्या इंडिया तील घटक पक्षांना दिला. यावर शरद पवार यांच्या या दाव्यावर विश्वासच ठेवता येणार नाही. जेव्हा ते एनडीएसोबत जाणार नाही, असे सांगतात तेव्हा त्याचा उलटा अर्थ घ्यावा लागतो.
राज्यपाल म्हणजे काय सकाळचा भोंगा आहे काय? उठला आणि वाजायला सुरुवात झाली. संजय राऊत समजलं का राज्यपालांना? भोंगा वाजवायची सवय संजय राऊत तुमची आहे. राज्यपालांची नाहीये. ते शांत राहून बरोबर आपलं काम करतात. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, असं म्हणत राज्यपाल रमेश बैस यांच्या कामकाजावर बोलताना शिरसाटांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
