तर मी तुमची औकात काढणारच; लोकसभेत नारायण राणेंचा ठाकरे गटाला इशारा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास ठरारावर चर्चा सुरू होती. विविध विषयाला हात घालत सदस्य केंद्रसरकारवर निशाणा साधत आहेत. महाराष्ट्रातील ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. तर महाराष्ट्र सरकार असंवैधानिक असल्याचा आरोप त्यांनी केला. मणिपूरवर विषयावर सरकार गप्प का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हिंदुत्वासह अनेक मुद्दे मांडत त्यांनी जोरदार हल्ला केला.

त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी उभे राहिले खासदार अरविंद सावंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना पार औकात शब्दांचा उल्लेख केला.नारायण राणे म्हणाले की, अरविंद सावंत यांनी केलेलं भाषण ऐकून मला वाटलं मी महाराष्ट्र विधान सभेत बसलो आहे. अरविंद सावंत यांनी श्रीकांत शिंदे यांना उत्तर दिलं होत. हे पळपुटे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? असा खोचक सवाल सावंत यांनी केला होता.

नारायण राणे पुढे म्हणाले, शिवसेनेचा ठाकरे गट एनडीए सोडून पवार साहेबांसोबत गेला तेव्हा त्यांना हिंदुत्व आठवले नाही. आता काही उरले नाही. आता जो आवाज येत आहे तो मांजराचा आवाज आहे, सिंहाचा आवाज राहिला नाही. आता आमच्या पंतप्रधानांवर कोणतेही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. त्यांची औकात नाही. जर कोणी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याकडे बोट दाखवले तर मी तुमची औकात काढेल, असा इशाराच राणेंनी दिला आहे.