खासदार श्रीकांत शिंदेंनी संसदेत केलं हनुमान चालिसाचं पठण

मणिपूरमध्ये मागील दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्या विरोधात विरोधी पक्षांनी मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आला. या अविश्वास प्रस्तावावर मंगळवारी लोकसभेत जोरदार चर्चा सुरु आहे. या अविश्वास प्रस्तावासंदर्भात बोलत असताना शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यूपीए चे नाव घेतले की लोकांना फक्त घोटाळे आठवतात, त्यामुळे विरोधकांनी आपल्या आघाडीचे नाव बदलले असल्याचा खोचक टोला शिंदे यांनी लगावला. यादरम्यान, श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालिसाचे पठणही केले.

श्रीकांत शिंदे म्हणाले की, एकेकाळी महाराष्ट्रात हनुमान चालिसा वाचण्यास बंदी होती. त्यांच्या भाषणादरम्यान एका महिला खासदाराने त्यांना विचारले की तुम्हाला हनुमान चालीसा माहित आहे का? या प्रश्नानंतर श्रीकांतने घरातच हनुमान चालिसाचे पठण सुरू केले. त्यांनी सुमारे 30 सेकंद हनुमान चालिसाचे पठण केले. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे सभागृहात बोलताना म्हणाले की, “महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपसोबत निवडून आली आणि काँग्रेससोबत युती केली. त्यांनी १३ कोटी लोकांसोबत गद्दारी केली, हे आम्हाला मान्य नव्हतं. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी परत भाजपसोबत सरकार स्थापन केलं.”

खुर्चीसाठी ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आघाडी केली. ठाकरेंनी खुर्चीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आघाडी केली.2019 मध्ये तुम्ही कुणाचे फोटो लावून निवडणूक लढवली आणि लोकांनी कुणाला बहुमत दिले. मात्र निवडणुकीनंतर स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देत काँग्रेससोबत आघाडी यांनी केली. यांनी मतदारांसोबत गद्दारी करण्याचे काम केले. 13 कोटी मतदारांशी गद्दारी यांनी केली.अशी टीकाही यावेळी श्रीकांत शिंदे यांनी केली.

विरोधकांच्या आघाडीमध्ये प्रत्येक नेत्याला पंतप्रधान व्हायचे आहे. ‘अडला हरी गाढवाचे पाय धरी’, मराठी म्हणीचा उल्लेख शिंदे यांनी केला. यांच्या टिमला कोणीच कॅप्टन नाही आणि यांना वडकप जिंकायचा आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी विरोधकांच्या आघाडीची खिल्ली उडवली. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतरच मणिपूरचा चांगला विकास झाला आहे. काँग्रेसच्या काळात कोणत्याच प्रकारचा विकास झाला नाही असं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत बोलताना केलं.