कृषी विद्यापीठातील घडामोडींची माहिती तातडीनं माध्यमांपर्यंत पोहोचवा – मंत्री धनंजय मुंडे

कृषी विद्यापीठातील घडामोडीबाबतची माहिती माध्यमांपर्यंत तातडीने पोहोचवण्याची सक्त सूचना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विद्यापीठांना दिली आहे. राज्यातील हवामान बदल, शेतीतील नवनवीन प्रयोग, संशोधन याबाबतची माहिती नियमीत माध्यमांना देण्याबाबत कृषीमंत्री मुंडे यांनी सूचना केली आहे. कृषी विद्यापीठातील सकारात्मक घडामोडींची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्यानं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली होती.दरम्यान, कृषी विद्यापीठातील घडामोडीबाबतची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यास विलंब होत आहे. त्यामुळं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. कृषीमंत्री मुंडेंच्या नाराजीनंतर कृषी खात्याकडून परिपत्रक जारी करुन तत्काळ माहिती पोहोचवण्याचे विद्यापीठांना आदेश आले आहेत.

कृषिमंत्र्यांच्या नाराजीनंतर कृषी खात्याकडून परिपत्रक जारी करुन तत्काळ माहिती पोहोचवण्याचे विद्यापीठांना आदेश आले आहेत.दरम्यान, मागील चार दिवसापूर्वीच कऋी ,विद्यापीठांमधील तज्ज्ञांची धनंजय मुंडेंनी बैठक घेतली होतीय यामध्ये चालू खरीप हंगामात राज्यातील कृषी विद्यापीठांनी शेतीशी संबंधित कामांसाठी ड्रोनद्वारे फवारणीचे पथदर्शी प्रकल्प राबवावेत असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले होते. शेतीमधील दैनंदिन कामासाठी मजुरांची उपलब्धता कमी झाली आहे. मजूर उपलब्ध झालेच तर मजुरीचे दर शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर चालले आहेत. त्यामुळं ड्रोनद्वारे शेतीमधील खते फवारणी, कीटकनाशक फवारणी अशी दैनंदिन कामे होणे आवश्यक असल्याचे मुंडे म्हणाले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये रिमोट पायलट (ड्रोन) प्रशिक्षण संस्था (आर.पी.टी.ओ.) अंतर्गत सुरु असलेले ड्रोन प्रशिक्षण केंद्र इतर विद्यापीठातही चालू करण्यासंदर्भात प्रकल्पाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. यावेळी मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, उपसचिव संतोष कराड, तसेच कृषी विद्यापीठाचे संबंधित विभागाचे संशोधन अधिकारी, प्राध्यापक व पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील कृषी विद्यापीठांनी शेतीशी संबंधित कामांसाठी ड्रोन वापरण्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी चालू खरीप हंगामात पथदर्शी प्रकल्प हाती घ्यावेत, असे निर्देश मुंडे यांनी दिले होते. त्यानंतर आज कृषी विभागाने एक परिपत्रक जारी करुन कृषी विद्यापीठांमधील घडामोडींची, नवीन प्रयोगांची माहिती माध्यमांना तातडीने देण्याच्या सूचना केल्या आहेत.