खोके-खोके ओरडणाऱ्यांकडे कंटेनर, त्यांनी तर कोरोनालाही सोडले नाही; राज ठाकरेंची ठाकरे गटावर टीका

एकनाथ शिंदे ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळी त्यांच्यासह शिंदे गटातील आमदारांना महाविकास आघाडीकडून खोके, गद्दार म्हणून टीका केली गेली. अजूनही खोकेबहाद्दर बोलले जात आहेच. मात्र आज दीड वर्षांनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे पनवेल येथील मेळाव्यात हा मुद्दा उपस्थित करत ठाकरे गटावर घणाघाती टीका केली.

जे खोके खोके ओरडत त्यांच्याकडे कंटेनर आहेत असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. प्रत्येक वेळी यायचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचं आणि तुम्हाला इमोशनल करतायचं. आज हे जे ओरडत आहेत ना खोके खोके त्यांच्याकडे कंटेनर्स आहेत. कोविड पण त्यांनी सोडला नाही. हेच तुमच्याकडे येणार निवडणुकीच्या तोंडावर आणि कुणालातरी दाखवणार. प्रत्येक वेळी यायचं बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि तुम्हाला इमोशनल करायचं हेच सुरु आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. पनवेलमध्ये मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आहे त्यात बोलत असताना राज ठाकरेंनी उद्धव ठारेंवर टीका केली.

आपलं यान चंद्रावर जाऊ शकतं पण रस्ते चांगले होऊ शकत नाहीत. ला अजून कळलं नाही चांद्रयान जे गेलंय चंद्रावर काय उपयोग आहे आपल्याला? तिथे जाऊन खड्डेच बघायचे आहेत. ते महाराष्ट्रात सोडलं असतं तर खर्चही वाचला असता. कोकणातील जमिनी इतरांच्या घश्यात चालल्या आहेत. नाणार प्रकल्प रद्द होतोय म्हटल्यावर लगेच बारसू प्रकल्प आला. इथे कोणी जमिनी घेतल्या, कोणाच्या नावावर पाच हजार एकर जमीन घेतली. आपलीच लोक आहेत. कुंपण शेत खातंय. असे राज ठाकरे म्हणाले.