एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारमधून बाहेर पडले. आपल्या समर्थक आमदारांसोबत ते भाजपसोबत गेले. सरकार स्थापन केलं. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे शिवसेनेत दोन गट पडले. अशात दोन्ही गटांकडून विरोधी गटातील आमदार-नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत होता. आता उद्धव ठाकरे आणि शिंदेगटाचे आमदार यांच्यात भेट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावर आता शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी या सगळ्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाचे आमदार भेटले का? याबाबत तुमच्याकडे कुठली माहिती आहे का? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला असता संजय शिरसाट यांनी उत्तर दिले. आमचे आमदार उद्धव ठाकरेंना भेटले नाहीत. तर याउलट त्यांच्याच आमदारांचा मुख्यमंत्री शिंदेंशी भेटण्याचा प्रयत्न चालू असतो. ते म्हणतात की, आमचे इथे काय होणार? आम्हाला तुमच्यात सामावून घ्या. ठाकरे गटाचे अनेक आमदारांच्या संपर्कात आहेत. त्याचे काय ऑपरेशन होणार आहे आता तुम्हाला लवकरच कळेल. ठाकरे गट द्विधा मनस्थितीत आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमुळे ठाकरे गटाचा बीपी हाय झाला असल्याचा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसची वैचारिक बैठक जुळत नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्या गटाचे सर्वंच आअमदार सालईनवर असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार यांनी ठाकरे गटाला बाजूला केले असल्याचेही ते म्हणाले.संजय राऊत यांचं राजकीय आरोग्य बिघडलं आहे. म्हणून त्यांच्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे दवाखाना काढला आहे. 24 तास काम करणारा मुख्यमंत्री मिळाला हे यांचं खरं दुखणं आहे. पहिला मुख्यमंत्री कोणाला भेटत नव्हता काम करत नव्हता. त्यामुळे यांच्या डोक्यात आलेल्या भन्नाट कल्पनाही मांडत असतात, असंही शिरसाट म्हणाले.
