राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पुन्हा येईन म्हणाल्याची अजूनही दहशत आहे. मी पुन्हा आलोच होतो. पण काही लोकांनी बेईमानी केली म्हणून राज्यावर येऊ शकलो नाही. पण ज्यांनी बेईमानी केली त्यांचा पूर्ण पक्ष घेऊनच आम्ही आलो, असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
शिर्डी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी मागच्या काळात म्हणालो होतो, पुन्हा येईन. त्याची दहशत अजून पाहायला मिळते. राष्ट्रीय नेते म्हणाले फडणवीस पुन्हा येईन म्हणाले आणि असे आले. त्यांना सांगतो, मी पुन्हा आलोच होतो. पण काही लोकांनी बेईमानी केली म्हणून राज्यावर येऊ शकलो नाही. पण ज्यांनी बेईमानी केली त्यांचा पूर्ण पक्ष घेऊनच आम्ही आलो.
