सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत विविध पदांची भरती निघाली असून यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022 चे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.
अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठाचे पदवीधर, पदवी परीक्षेच्या शेवटच्या वर्षास बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र रमापा उमेदवारांनी मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. तसेच अंतर्वासित किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे.
एमपीएससी अंतर्गत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब च्या एकूण 823 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक (गट-ब) च्या 78 जागा, राज्य कर निरीक्षक (गट-ब) च्या 93 जागा, सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) च्या 49 जागा आणि पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) च्या 603 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2022 रोजी18 ते 38 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ उमेदवारांना यामध्ये 5 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 544 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल. तर मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग उमेदवारांकडून 344 रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल. ही परीक्षा अमरावती, छ.संभाजीनगर , नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुणे येथील परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 1 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
